Pune News : पुणे : पुणे-नगर रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर उपचारांना विलंब झाल्यास त्यांच्या जीवावर बेतते. हे टाळून रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी वाघोलीत लवकरच ‘ट्रॉमा केअर युनिट’ सुरू करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. यामुळे पुणे-नगर रस्त्यासह आसपासच्या परिसरात होणाऱ्या अपघातांमधील जखमींवर तत्काळ उपचार करणे शक्य होणार आहे.
पुणे-नगर रस्त्यावर वाघोली परिसर आणि तेथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या भागात नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यातच या परिसरात अपघात झाल्यास जखमींना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करावे लागते. वाघोली ते ससून रुग्णालय या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी असते. (Pune News) त्यामुळे ससून रुग्णालयात जाण्यासाठी बराच वेळ लागतो. विलंबामुळे रूग्ण दगावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या परिसरात ‘ट्रॉमा केअर युनिट’ सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती.
वाघोली येथे ‘ट्रॉमा केअर युनिट’ सुरू करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने राज्य सरकारला पाठवला होता. सरकारने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे. (Pune News) दरम्यान, ट्रामा केअर युनिटसाठी जागेची पाहणी तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.
‘ट्रॉमा केअर युनिट’ची कशासाठी?
ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पडणे, मोटार वाहनाची धडक किंवा बंदुकीच्या गोळीने झालेल्या जखमा यासारख्या गंभीर दुखापतींमुळे ग्रस्त असलेल्या रुग्णांची काळजी घेतली जाते. ट्रॉमा सेंटर मोठ्या आघातग्रस्तांची काळजी घेण्यासाठी सुसज्ज असते. ट्रॉमा सेंटर्स त्यांच्या विशिष्ट क्षमतेनुसार बदलतात. ते “लेव्हल” या पदनावाने ओळखले जातात. ट्रॉमा सेंटर्सच्या सर्वोच्च स्तरांवर आपत्कालीन औषध, ट्रॉमा सर्जरी, क्रिटिकल केअर, न्यूरोसर्जरी, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, ऍनेस्थेसियोलॉजी आणि रेडिओलॉजी तसेच विविध प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया आणि निदान केले जाते. (Pune News) रुग्ण दाखल झाल्यापासून त्याची प्रकृती स्थिर होईपर्यंतची सगळी काळजी या युनिटमध्ये घेतली जाते. सध्या विशेष बाब म्हणून वाघोली येथे ‘ट्रॉमा केअर युनिट’ सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यात किंवा महामार्गावर अपघात झाल्यास त्वरित वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. जागेची पाहणी करून त्यानुसार येथे खाटांची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
‘ट्रॉमा केअर युनिट’ची उपयुक्तता
– पुणे-नगर मार्गावर ‘रांजणगाव एमआयडीसी’मुळे जड वाहनांची संख्या अधिक.
– शिक्रापूरपर्यंत रस्त्याच्या बाजूला असणारी मोठी गावे.
– ससून रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होणार.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रस्ता चुकलेल्या आठ वर्षीय सिमरनची दीड तासात घडवली कुटूंबासोबत भेट
Pune News : बिल्डरचा बंगला फोडून चोरट्यांनी २९ लाखांचा ऐवज केला लंपास