Pune News : पुणे : मोहरमनिमित्त शनिवारी (ता. २९) शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मोहरम सणानिमित्त ताबूतांच्या मिरवणुका निघतात. यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारी दुपारनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
दुपारी तीनच्या सुमारास मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ
मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शिवाजी रस्त्यावरील श्रीनाथ चित्रपटगृहाजवळून करण्यात येणार आहे. श्री दत्त मंदिर, बेलबाग चौक, बुधवार चौक, जिजामाता चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा चौक, डेंगळे पूल, गाडीतळ चौक, आरटीओ चौकातून संगम पूल येथे मिरवणुकीचे सांगता करण्यात येणार आहे. (Pune News ) लष्कर परिसरातील मिरवणुकीची सुरुवात दुपारी बाराच्या सुमारास ताबूत स्ट्रीट येथून करण्यात येणार आहे. सरबतवाला चौक, बाबाजान दर्गा, भोपळे चौक, महात्मा गांधी रस्ता, कोहिनूर चौक, नाझ हॉटेल चौक, नेहरु मेमोरिअल हॉल, समर्थ पोलीस ठाणे, पॉवर हाऊस चौक, अपोलो चित्रपटगृह, दारुवाला पूल, फडके हौद, मोती चौक, सोन्या मारुती चौक, बेलबाग चौकातून लष्कर भागातील ताबूत मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.
खडकी भागातील मिरवणूक बोपोडी चौकमार्गे जाणार आहे. दापोडी येथे मिरवणुकीची सांगता करण्यात येणार आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. लष्कर भागातील इमामवाडा येथून सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरवणूक काढण्यात येणार आहे. ताबूत, पंजे मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.(Pune News ) मिरवणूक मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार असून मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते वाहतुकीस खुले करुन देण्यात येणार आहेत, असे पोलीस उपायुक्त मगर यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकराला नडला चांगुलपणा; एकाच दिवशी दोन भामट्यांकडून मोबाईल अन् बाइकची चोरी…
Pune News : पुणे मेट्रो सेवेचा विस्तार; प्रवास करा अन् मिळवा तिकिटदरात सवलत…
Pune News : हडपसर, वानवडी परिसरातील गुन्हेगारीवर वचक; ६५ गुंड एकाचवेळी जिल्ह्यातून हद्दपार!