Pune News : पुणे : व्याजाने घेतलेले पैसे वेळच्यावेळी देत नसल्याचा जाब विचारत, दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली. पैसे आणून दिल्यानंतरच दुचाकी मिळेल, असे सांगत तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकी घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास मांजराई रिक्षा स्टँडजवळ घडला होता.
मांजराई रिक्षा स्टँडजवळ घडला प्रकार
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अजय सिंग दुधानी, निहालसिंग टाक, बच्चनसिंग भोंड यांच्यावर महाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) याबाबत राहुल बबन आवताडे (वय-२८, रा. मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले आहेत. फिर्यादी हे मांजराई रिक्षा स्टँड जवळ दुचाकीवर थांबले असता, आरोपींनी त्यांच्याजवळ येऊन शिवीगाळ करुन व्याजाचे दररोजचे पैसे का देत नाही, अशी विचारणा केली. फिर्यादी आवताडे याने पैसे नसल्याचे सांगितले. (Pune News) त्यानंतर आरोपींनी त्यांची दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली. तू पैसे आणून दे, त्यानंतरच तुला दुचाकी मिळेल, असे सांगण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, पैसे परत केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पांढरे पट्टे नसल्याने गतिरोधक धोकादायक
Pune News : राज्यात वेगवेगळ्या खात्यात दिड लाख पदांची भरती करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार