Pune News : पुणे : प्रेमसंबंधातून टोकाचे पाऊल उचलल्याच्या अनेक घटना उघडकीला येत आहेत. नुकताच कोंढवा परिसरात असाच एक प्रकार उघडकीला आला आहे. प्रेमसंबंधातून ते दोघे एकत्र राहात होते. अचानक महिला कुणालाही काहीही न सांगता निघून गेली. याचा राग डोक्यात ठेऊन, तुझ्या आईला कोठे लपवून ठेवले आहेस ते सांग? असे विचारुन मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
एकाविरोधात गुन्हा दाखल
याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात एका २३ वर्षांच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका ४१ वर्षांच्या गृहस्थाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे कोंढवा येथे एकाच वस्तीमध्ये रहातात. (Pune News) फिर्यादी यांची आई व आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून फिर्यादीची आई सुमारे १५ दिवसांपासून आरोपीच्या घरी राहात होती. मात्र, फिर्यादीची आई अचानक घर सोडून निघून गेली. त्यामुळे आरोपी हा वारंवार फिर्यादीला फोन करुन तू तुझ्या आईस कोठे लपवून ठेवले ते सांग, असे म्हणून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत होता. या प्रकाराला कंटाळून अखेर कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या घटनेचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात शेषनागाची फुलांची सजावट
Pune News : कोरेगाव पार्कमध्ये धुम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
Pune News : तरुणाला अडवून, कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; तिघे पोलिसांच्या ताब्यात