Pune News : खडकवासला, (पुणे) : कोथरूड मधून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच ब्लास्ट करून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. गुरुवारी (ता. २०) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे.
एका तासात आरोपी जेरबंद
अमोल महादेव वाघ (वय-३३ सध्या रा. जुनी स्मशानभूमी, इंदिरा वसाहत, उत्तमनगर, पुणे, मूळ राहणार – कोरेगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास “डायल ११२” या पोलीस मदत कक्षास एकाने फोन करून, तीन जण एनडीए कमांड हॉस्पिटल आणि अहमदनगर मध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याची माहिती दिली. त्यांच्या जवळ मशीन गन आणि आरडीएक्स आहे. असे सांगितले. (Pune News) त्यांने कॉल करताना दोघांचे फोन नंबर ही दिले. ते दोघे एनडीएमध्ये ब्लास्ट करणार असल्याची खबर दिली. त्याचबरोबर त्या तीन जणांची नावे आणि मोबाईल क्रमांक देऊन, त्या व्यक्तीने फोन कट केला. यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाने याबाबत तत्काळ उत्तमनगर पोलीस स्टेशनशी संपर्क करून, एनडीएच्या सुरक्षेबाबत कळवत, कॉल करणाऱ्याने दिलेली माहिती पुरवली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी एनडीए गाठले. लेफ्टनंट कर्नल थापा, कर्नल पांडे आणि मेजर ठोंबरे यांनी एनडीएची यंत्रणा अलर्ट केली. दुसऱ्या बाजूला पोलिसांना कॉल आलेल्या नंबरचे लोकेशन शोधले. (Pune News) तसेच कॉल करणाऱ्याला एका तासाच्या आत पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या वडिलांनी जमीन विकली. त्याला काही ही दिले नाही. वडिलांनी आणि सासऱ्यांने मानसिक त्रास दिला आहे. त्या रागातून त्याने तो फोन दारूच्या नशेत केल्याचे स्पष्ट झाले. वडिलांनी आणि सासऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने कॉल केल्याचे यावेळी निष्पन्न झाले.
उत्तमनगर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरील कॉल त्याचे वडील सासरा आणि मेव्हण्याचा बदला घेण्यासाठी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.अमोल वाघ हा टेंपो चालक असून, त्याने त्याचा मालक “मोदी” यांच्या मोबाईलवरून “डायल ११२” ला कॉल लावला होता. त्यामुळे ‘मोदी’ यांच्या नावावर रजिस्टर असलेल्या मोबाईल वरून कॉल गेल्याने त्यांनाही पोलिसांच्या तपासाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, वडील संपत्ती मध्ये हिस्सा देत नाहीत. सासरे आणि मेव्हणा पत्नीला नांदायला पाठवत नाहीत. सगळे एक झालेत आणि याला मात्र किंमत देत नाहीत. (Pune News) या गोष्टीचा सूड उगवण्यासाठी त्या तिघांची नावे आणि नंबर सांगून वाघ याने “डायल ११२” ला कॉल लावला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात त्याचा बनावटपणा उघडं होऊन, आता त्या कायदेशीरला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्याच्या दुर्गम भागातील ३५५ शाळा दोन दिवस बंद ठेवणार