Pune News : पुणे : गणेशभक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. शहरात आकर्षक मंडप उभारणीसाठी लगबग सुरू झाली आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असणार आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून यंदा गणेशोत्सवाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु झाली असून, भाजपने यासंदर्भात बैठक घेऊन रणनीती तयार केली आहे.
गणेशोत्सवाच्या आधी जाहीर होणार शहर कार्यकारिणी
भाजपची पुणे शहराची कार्यकारणी गणेशोत्सवाच्या आधी जाहीर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत गणेशोत्सवाच्या निमित्ताने पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आराखडा तयार केला गेला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. (Pune News) आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपकडून केंद्रीय पातळीवरुनच सुरु झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही डोळ्यांसमोर ठेवून सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजपने आणि महायुतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठीगणेशोत्सवाचा लाभ घेण्यासाठी भाजप सज्ज आहे.
दरम्यान, गणेशोत्सव काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले असून, त्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भाजपकडून निमंत्रण दिले जाणार आहे. (Pune News) यामुळे पुणे शहरात गणेशोत्सवात महायुतीचे शक्तीप्रदर्शन होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात दहीहंडी पहायला जाताय? शहरातील वाहतूकीत झालेले बदल नक्की जाणून घ्या!