Pune News : पुणे : आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोशल मीडियाने पछाडले आहे. सोशल मीडियावर रील्स बनवण्याची भयानक क्रेझ सध्या सर्वांमध्ये आहे. मात्र हीच क्रेज जीवावर बेतल्याची उदाहरणेही काही कमी नाहीत. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्यासाठी विशेषतः तरुणाई जिवाचा आटापीटा करताना दिसत आहे. आता पुण्यातील हडपसरमधील एका तरुणाने तर रीलमधून थेट पुणे पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. या रीलमध्ये तरुण म्हणतो, ‘हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते…’ या रीलमुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.
पोलिसांनी घेतले ताब्यात
काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडची ‘लेडी डॉन’, ‘थेरगाव क्वीन’म्हणून ओळखली जाणारी तरूणी रीलमुळे चर्चेत आली होती. अश्लील भाषा वापरल्यामुळे तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिली होती. त्यानंतर आता पुण्यातील हडपसर मधील एका तरुणाने बादशाह नावाचे रिल्स बनवून थेट पुणे पोलिसांचा आव्हान दिले आहे. (Pune News) पवन संतोष भारती (वय २० वर्षे, रा. तरवडे वस्ती, मोहम्मदवाडी, पुणे) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. त्याला गुन्हे शाखा युनीट ६ च्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदातीकरण करण्यात येत असून, ही चिंतेची बाब बनल्याचे मत पोलीस व्यक्त करत आहेत. (Pune News) हडपसरमधील या तरुणाने सोशल मीडियावर बनविलेले एक रील सद्या चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, पुणे शहरात सध्या दहशतवाद्यांचे जाळे विस्तारत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यातच कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची विक्री होत आहे. नुकताच पोलिसांनी तब्बल एक कोटीचा आफीमचा साठा जप्त केला आहे. (Pune News) असे असताना येथे गुन्हेगारी चालते… असे रील बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये भितीचे वातावरण तयार केले जात आहे. या गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता पोलिसांकडून आरोपीवर काय कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. रीलच्या माध्यमातून अनेक तरुण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक! पुण्यात तब्बल एक कोटीचा ड्रगचा साठा जप्त
Pune News : अनैतिक प्रेमसंबंधातून कोंढव्यात मुलाला जीवे मारण्याची धमकी