Pune News : धनकवडी : जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल प्रतिकूल परिस्थितीत देखील यशाला गवसणी घालणे अवडघड नाही, हे सिद्ध करून दाखवले आहे, भारती विद्यापीठामध्ये रखवालदार म्हणून काम राहणाऱ्या कुंडलिक साळुंखे यांचा मुलगा समाधान साळुंखे याने! सनदी लेखापाल होण्यासाठी ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने मे २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेत समाधान उत्तीर्ण झाला असून, त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोठ्या कष्टाने यश खेचून आणलेल्या मुलाचे यश पाहून वडील कुंडलिक साळुंखे यांना आनंदाश्रू लपवता आले नाहीत.
मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी घर सोडलं
कुंडलिक साळुंखे याचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे. घरची हलाखीची परिस्थिती. वडील कुंडलिक मोलमजुरी करून घर चालवतात. मोलमजुरीचे पैसे घरसंसार व मुलांचे शिक्षण यासाठी अपुरे पडू लागले, कधी कधी हाताला काम मिळत नसे. (Pune News) त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी घर सोडलं अन् मुंबई गाठली. मुंबईमध्ये सात वर्षे हमाली केली. ओझी उचलून मानेजवळील मणक्यात गॅप पडली त्यामुळे हातचे काम गेले. मुलाचे शिक्षण थांबले, त्यामुळे काय करावे, असा प्रश्न होता. अखेर त्यांनी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला. पुण्यात भारती विद्यापीठामध्ये रखवालदाराची नोकरी मिळाली.
दरम्यानच्या काळात समाधानचे प्राथमिक शिक्षण वेल्हे तालुक्यातील कोळवडी येथील जिल्हा परिषद शाळेत तर आठवी ते दहावीचे शिक्षण श्री सरस्वती विद्यालय मांगदरी येथे झाले. समाधानने दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातूनच घेतले. दहावीमध्ये असतानाच सनदी लेखापाल ही पदवी मिळवायची असे स्वप्न त्याने पाहिले आणि इंग्रजी कॉमर्समध्ये शिक्षण घ्यायचे ठरवले. (Pune News) गावी इंग्लिश कॉमर्स नसल्याने अकरावी आणि बारावी अभिनव कॉलेज, आंबेगाव येथून केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुढचा सीएचा प्रवास सुरू झाला.
याबाबत बोलताना समाधान म्हणाला की, माझ्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. आमच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. वडील कष्ट करून आमच्यासाठी एक स्वप्न पाहत होते. ही परिस्थिती अगदी लहानपणापासून पाहत असल्याने वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्न आपण पूर्ण करायचे, अशी खूणगाठ मनाशी बांधली होती. (Pune News) मात्र, या प्रवासात अडथळ्यांचा डोंगर समोर उभा होता. नातेवाइकांमध्ये देखील कोणी उच्च शिक्षण घेतलेले नव्हते. मात्र, ध्येय एकच होते, सीए पूर्ण करायचे… या उमेदीमुळेच मी मनापासून अभ्यास करू शकलो आणि आनंदाची बाब म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये सीए परीक्षा पास झालो. आज माझ्या आई-वडिलांचे स्वप्न मी पूर्ण करू शकलो, याचा जास्त आनंद आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : स्वारगेट चौकात भरदिवसा गोळीबार करणारे आरोपी अटकेत ; 2 पिस्तुलांसह 31 जिवंत काडतुसे जप्त
Pune News : पुण्यात गुन्हेगारांकडून चक्क पेलिसांनाच मारहाण; सामान्य जनतेची सुरक्षा रामभरोसे…!