Pune News : पुणे : दिवे घाटात बांधकाम मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटून १४ बांधकाम मजूर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १८) घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका मजुराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
स्लॅब टाकण्याचे साहित्य घेऊन सासवडकडून हडपसर भागात भेकराईनगर येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर टेम्पो निघाला होता. याच टेम्पोमध्ये मजूर देखील बसले होते. (Pune News ) दिवे घाटातील दुसर्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने, रस्त्याच्या कडेला टेम्पो उलटला. सर्व साहित्य कामगारांच्या अंगावर पडले. यामुळे मजूर जखमी झाले.
१३ जणांवर उपचार सुरू
दरम्यान, टेम्पोतील १४ मजुरांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना तातडीने सासवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले. (Pune News ) उपचारादरम्यान एका मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली. अपघातात किरकोळ दुखापत झालेल्या मजुरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी उलटलेला टेम्पो बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धारदार शस्त्राने वार करुन 90 हजारांची रोकड नेणाऱ्या 5 आरोपींना दोन तासांत अटक
Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळातर्फे बुधवारी अथर्वशीर्ष पठण; पुण्यात मध्य भागात वाहतुकीत बदल
Pune News : व्याजाच्या पैशांसाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी