Pune News : पुणे : राज्यात मंगळवारी बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. पुणेकरांनी बाप्पांचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत केले. गणपतीच्या नैवेद्यासाठी पुणेकरांनी यंदा मोदक आणि मिठाईची विक्रमी खरेदी केली. एका दिवसात सुमारे ३० टन पेढे आणि मोदकांची विक्री पुण्यात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीमध्ये १० टक्के वाढ झाली आहे. गणपतीचा आवडता प्रसाद मोदक असल्यामुळे, पुणेकर भाविकांनी बाप्पांसाठी मोदक खरेदीला प्राधान्य दिले.
यंदा विक्रीमध्ये १० टक्क्यांनी वाढ
यंदा गणपतीचे स्वागत मोठ्या उत्साहात झाले. प्रसादासाठी फक्त माव्याचे नाही, तर विविध प्रकारचे मोदक बाजारात उपलब्ध होते. शंभरपेक्षाही जास्त मोदकांचे प्रकार यंदा मिठाईवाल्यांनी तयार केले होते. त्यात आंबा मोदक, मावा मोदक, उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक यांना चांगली मागणी होती. (Pune News) लहान मुलांसाठी पालकांनी चॉकलेट मोदक विकत घेण्याला प्राधान्य दिले. खवा, खोबरे, दाणे बारीक करून, हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवलेल्या मोदकांना चांगली मागणी होती.
पुणेकर भाविक गणपतीसाठी स्वतःच्या हातांनी प्रसाद तयार करण्यात देखील मागे नाहीत. यासाठी मिक्स मोदक अनेकांनी घरात तयार केले. (Pune News) यासाठी पनीर, खवा, साखर, केशर, वेलची या पदार्थांची देखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली. पंचखाद्य मोदक खारीक, खसखस, बदाम, काजूपासून घराघरात तयार केले गेले. यामुळे एकाच दिवसात घराघरात मोदक विक्रमी संख्येने तयार झाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे शहर महायुतीच्या समन्वयकपदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती
Pune News : यंदा बाप्पांचे विसर्जन हौदांमध्ये होणार; नदीपात्रात विसर्जनाला महापालिकेची मनाई