Pune News : पुणे : नागपूर विमानतळावरुन पुणे शहराकडे येणारे विमान हवेत झेपावण्यासाठी सज्ज झाले होते. प्रवासी विमानात बसून विमान हवेत झेपावण्याची वाट पाहत होते. प्रवासासाठी पायलट देखील तयार होता. पायलट विमानतळाच्या बोर्डिंग गेटवर पोहचला देखील… तो विमानात चढणार एवढ्यात धाडकन खाली कोसळला. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रसंगामुळे प्रवाशांसह विमानतळ प्रशासनाची देखील तारांबळ उडाली. संबंधित पायलटला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी पायलटला मृत घोषित केले. हा मृत्यू ह्रदयविकारामुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पायलटचा अचानक मृत्यू
नागपूरवरुन पुणे शहरात विमान घेऊन जाण्यासाठी कॅप्टन मनोज सुब्रमण्यम गुरुवारी नेहमीप्रमाणे तयार झाले होते. मात्र, विमान बोर्ड होण्यापूर्वी ते बोर्डिंग गेटजवळ कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. (Pune News ) रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी दिली. रुग्णालयातील सूत्रांनी सुब्रमण्यम यांचा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याची शक्यता वर्तवली आहे.
सुब्रमण्यम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती रुग्णालयाचे प्रवक्ते एजाज शमी यांनी दिली. सुब्रमण्यम यांचा अचानक मृत्यू वेदनादायी असल्याची प्रतिक्रीया इंडिगो कंपनीने व्यक्त केली आहे. (Pune News ) दरम्यान, पायलटचा अचानक मृत्यू झाल्याचा हा आठवड्यातील तिसरा प्रकार आहे. त्यामध्ये दोन भारतीय पायलट आहेत. वैमानिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात आहेत देशातील सर्वाधिक हेलिकॉप्टर