Pune News : पुणे : विदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. पुण्यातील एका ५१ वर्षीय व्यक्तीस अमेरिकेतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मुकुंद पंडित (वय ५१, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार हा प्रकार २४ एप्रिल ते ५ मे २०२३ दरम्यान घडला. फिर्यादी पंडित यांना आरोपींनी अमेरिकेतील एका नामवंत कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट पदावर नोकरी लावून देतो असे सांगितले. (Pune News) त्यासाठी वेगवेगळ्या नंबरवरून संपर्क साधून बनावट ई-मेल आयडीवरून ऑफर लेटर पाठवत पंडित यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रजिस्ट्रेशन फी, कन्सल्टिंग फी भरावी लागेल, अशी कारणे सांगून तब्बल १ लाख २७ हजार रुपये उकळले.
पैसे घेतल्यानंतर संबंधितांनी नोकरीसाठी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंडित यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. (Pune News) याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात पृथ्वीराज सिंह, अविनाश मिश्रा आणि प्रवीण गुप्ता यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मोक्का लावलेल्या गुंडाची उपहारगृहात सरबराई; तीन पोलिसांच्या निलंबनाचे आदेश