Pune News : पुणे : पुण्यात वर्षाकाठी सव्वालाख आणि महाराष्ट्रात सात लाखांहून अधिक ऑनलाइन भाडेकरार होतात. यातून राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. एकीकडे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एका ‘क्लिक’वर कोणतीही कागदपत्रे अथवा हस्तांतरण करणे शक्य झाले आहे. असे असताना ऑनलाइन भाडेकरार करूनही पडताळणी आणि करारपत्र देण्यासाठी घरमालकासह भाडेकरूंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारण्याचा फतव्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन भाडेकरार केल्यानंतर पोलिसांना हे करारपत्र मिळत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
‘भाडेकरार ऑफलाइन नकोच,’ अशी भूमिका घरमालक, भाडेकरूंसह ‘असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर’ने घेतली आहे. या संदर्भात शहरात उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, ‘असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स’ तसेच ‘असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर’ यांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त आर. राजा यांची भेट देऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. (Pune News ) त्या शिष्टमंडळात ‘रिअल इस्टेट असोसिएशन’चे अध्यक्ष सचिन शिंगवी, अनिल पाटील, सचिन कात्रे, एस. के. शिंगवी, गणेश शेलार आणि ‘सर्व्हिस प्रोव्हायडर’च्या वतीने मंगेश पाटील, योगेश पपालिया, जितेंद्र वांबिरे उपस्थित होते.
कोंढवा पोलिसांनी पोलीस ठाण्यात येऊन कराराची प्रत आणि पोलीस पडताळणीची कॉपी घ्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यानंतर पुण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या नावाने समाजमाध्यमांमध्ये अशा पद्धतीची पोस्ट फिरू लागली आहे. (Pune News) त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, भाडेकरू, घरमालक, रिअल इस्टेट एजंट आणि भाडेकरार करणारे सर्व्हिस प्रोव्हायडरांनी आता पोलीस आयुक्तांनाच साकडे घातले आहे. ऑनलाइन भाडेकराराबाबत पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, याबाबत मिळआलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे ८५ टक्के घरमालक-भाडेकरू यांचे ‘ऑनलाइन’ करार झाले आहेत. भाडेकरार झाला पाहिजे. (Pune News ) जे करीत नाहीत, त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. पोलीस महासंचालक; तसेच पालकमंत्र्यांनी यापू्र्वी भूमिका स्पष्ट केली आहे. पोलीस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ नाही; तरीही पोलिसांना पडताळणी प्रत आणि करारपत्र देण्यासाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यात यायला हवेच का? याबाबत पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वाकी बुद्रुक येथे पुरुषोत्तम मास अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता..
Pune News : पुणे नाशिक महामार्गावर तीन मालवाहू वाहनांचा भीषण अपघात; वाहनांच्या लांबच लांब रांगा