Pune News : पुणे : चोरी करण्यासाठी चोरटे काय शक्कल लढवतील हे सांगता येणे अवघड आहे. समोरच्या व्यक्तीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन सराइतपणे चोरी करणाऱ्या चोरांचे शहरात पेव फुटले आहे. अशाच एका अजब चोरीचा अनुभव एका पुणेकर तरुणाला आला. शहरातील या २९ वर्षीय तरुणाकडे एका होतकरु व्यक्तीने केविलवाणा चेहरा करून मदत मागितली. व्यक्तीची दया आल्याने तरुणाने सढळ हस्ते मदत देखील केली. त्यानंतर मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, म्हणून मोबाईल मागितला… अडचण लक्षात घेऊन तरुणाने मोबाईल दिला… तोच मोबाईल घेऊन हा भामटा तेथून पसार झाला. चोरीची तक्रार दाखल करायला जाताना आणखी एकाने त्याची बाइक घेऊन पळ काढला. एकाच दिवशी दोघांनी फसवणूक केल्याने तेल गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे… अशी मदत करणाऱ्या तरुणाची अवस्था झाली आहे.
तेल गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे..
पुणे शहरात २० जुलै रोजी ही घटना घडली. २९ वर्षीय युवक नोकरीसाठी पुण्यात आला होता. घटना घडली त्यावेळी तो गाडीने घरी जात होता. रस्त्यात एका व्यक्तीने त्याला थांबवले. केविलवाणा चेहरा करून गयावया केली. मला बुलढाण्याला जायचे आहे. (Pune News) माझ्याकडे तेथे जाण्यासाठी पैसे नाहीत. मला मदत करा, असे सांगितले. त्यानंतर त्या युवकाने तातडीने त्याला ५०० रुपये ट्रॅन्सफर केले. मदत मिळताच त्याने कॉल करण्यासाठी फोन मागितला. युवकाने फोन देताच फोन घेऊन भामटा फरार झाला.
दरम्यान, फोन चोरी झाल्याची घटना घडताच युवकाने तत्काळ पोलिसांत धाव घेतली. त्यावेळी रस्त्यात त्या युवकाला आणखी एक व्यक्ती भेटली. पोलीस अधिकारी माझे मित्र आहेत. तुझे काम लवकर होईल, असे सांगत त्याच्या गाडीवर बसली. (Pune News)त्यानंतर त्या युवकासोबत तो चोर बाईकवर पोलीस ठाण्यात पोहचला. चोराने सांगितले की, पोलिसांसाठी सिगारेट घ्यावी लागेल… सिगारेट घेण्यासाठी त्या युवकाला पाठवले. तो सिगरेट घेण्यासाठी जाताच चोर बाइक घेऊन पसार झाला.
युवकाने दोन्ही घटनांची तक्रार पोलिसांत केली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे मेट्रो सेवेचा विस्तार; प्रवास करा अन् मिळवा तिकिटदरात सवलत…
Pune News : हडपसर, वानवडी परिसरातील गुन्हेगारीवर वचक; ६५ गुंड एकाचवेळी जिल्ह्यातून हद्दपार!
Pune News : पुणेकरांनो सावधान! शहरात डेंग्यूनंतर चिकुनगुन्याचाही शिरकाव; अशी घ्या काळजी!