Pune News : पुणे : मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे परक्याचे धन असे सर्वसाधारणपणे बोलले जाते. आई वडिलांच्या संकट काळात किवा म्हतारापणात मुलेच आधार देऊ शकतात. असा असलेल्या समजाला फाटा देत एका मुलीने तिच्या वडिलांना मृत्यूच्या दारातून परत आणत जीवनदान दिले आहे. या घटनेमुले बाप आणि मुलीचे अतुट प्रेम पु्न्हा एखदा जगासमोर सिध्द झाले आहे.
यकृत नादुरुस्त झाल्याने झाल्याने मृत्यूशी झुंजणाऱ्या वडिलांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी पोटच्या पोरीने वयाच्या १८व्या वर्षातच बापाला यकृत दान केले आणि बापाचा जीव वाचविला. (Pune News) ऋतुजा उर्फ ह्रिदिशा शेखर माने असे त्या मुलीचे नाव.
सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील घटना
पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात राहणारी ऋतुजा ही मूळची सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या छोट्याशा गावातून आली आहे. तिचे वडील शेखर माने हे गावातील राजकीय व्यक्ती त्यामुळे त्यांचा संपर्क दांडगा होताच. २०१७ मध्ये वडिलांनी नगरपालिकेची निवडणूक लढविली. (Pune News) त्याचा निकालाचा दिवस होता. त्यामुळे घरी सगळेच निकालाची वाट पाहत होते. निकाल मनासारखा लागला. त्यामुळे सर्वचजण खुश होते. त्यावेळी ऋतुजा कराड येथे तर भाऊ उत्कर्ष पुण्यामध्ये शिक्षण घेत होता. वडील निवडून आल्यामुळे दोघे गावाकडे निघाले होते. त्याचवळी प्रवासात असताना ऋतुजाला मैत्रिणीचा फोन आला की तिच्या वडिलांची प्रकृती खालावली आणि रुग्णवाहिकेतून त्यांना दवाखान्यात नेले आहे.
डॉक्टरांनी सांगितले की त्यांचे यकृत खराब झाले. केस हाताबाहेर आहे. वेळ फारच कमी आहे. यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे. निवडणूक नुकतीच झाल्याने घरात इतक्या मोठ्या पैशांची जुळवाजुळव करणे कठीणच होते तरी अनेकांकडून पै-पै करत पैशांची जुळवाजुळव सुरू झाली. आव्हान होते ते यकृतदाता भेटण्याची. (Pune News) सगळीकडे फोनाफोन झाली. अनेक राजकीय अधिकाऱ्यांकडून मोठ्या रुग्णालयात फोन खणखणले, मात्र परिणाम शून्य. अखेर ऋतुजाने निर्णय घेतला की आपण स्वत:च वडिलांना यकृतदान करायचे. त्यासाठी घरच्यांनी विरोध केला. यकृत दान केल्यावर तिच्या भविष्याचे काय? तिचे लग्न जुळविताना कोण मुलगा तिला स्वीकारणार किंवा त्यापुढे जाऊन तिच्या बाळंतपणात काय धोका येऊ शकतो अशा साऱ्या शक्यतांनी घरच्यांसह डॉक्टर व नर्स यांनीही तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांना जीवदान मिळण्यासाठी ऋतुजाने निर्णय पक्का केला. भविष्यातील लग्न, मूल यापेक्षा वडिलांचे जगणे सर्वात महत्त्वाचे त्यासाठी ती यकृतदानाच्या निर्णयावर ठाम राहिली.
अखेर शस्त्रक्रिया अन् ऋतुजाच्या निर्णय योग्य ठरला. वडील धोक्यातून बाहेर पडले आणि ऋतुजाची प्रकृतीही ठणठणीत राहिली. पुढे काही दिवसातच बाप-बेटी दोघेही अगदी ठणठणीत झाले.