Pune news : पुणे : पुण्यात गणेशोत्सवामध्ये साकारण्यात येणारे देखावे पाहण्यासाठी राज्यातूनच नाही, तर देशभरातून भाविक गर्दी करतात. दरवर्षी वर्षभरात घडून गेलेल्या घटनांचे प्रतिबिंब अनेक देखाव्यांमधून प्रतिबिंबीत होते. यंदा शास्त्रज्ञांनी चांद्रयान ३ मोहिम यशस्वी केल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात चांद्रयान मोहिमेचे देखावे पाहण्यास मिळणार, हे नक्की… याचबरोबर शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, पुन्हा राज्याभिषेक सोहळा जिवंत होणार आहे. त्याचबरोबर इतरही अनेक ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांचा समावेश देखाव्यांमध्ये असणार आहे. यंदा श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीबरोबरच गड-किल्लेही साकारण्यात येत आहेत.
श्रीराम मंदिराची प्रतिकृतीही दिसणार
गणेशभक्तांना देखाव्यांचे विशेष आकर्षण असते. दरवर्षी देखावे पाहण्यासाठी अलोट गर्दी असते. यंदा कारागिरांकडून मंदिरांमधील बारकावे साकारण्यावर भर आहे. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०सावे वर्ष आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगासह छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम उलगडणारे देखावेही साकारण्यात येत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक चित्रपटांमधील योद्ध्यांची कामगिरी देखाव्यात पाहता येणार आहे. (Pune news) पुराणकथा, मागील काही महिन्यांतील राज्यातील घडामोडींचे प्रतिबिंबही देखाव्यात साकारले जातील. उज्जैनमधील महांकाल मंदिर, काशीतील विश्वनाथ मंदिरासह दक्षिणेकडील विविध मंदिराच्या प्रतिकृती उभारण्यात येत आहेत. काही मंडळांकडून मंदिराची प्रवेशद्वारे साकारण्यात येत आहेत.
फायबर आणि लोखंडाचा वापर करत प्रतिकृती उभारण्यावर यंदा भर दिला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेगाने तयारी सुरू आहे. मंदिरे, चांद्रयानासाठी विविध गोष्टींच्या प्रतिकृती करण्यासाठी देखावे साकारणाऱ्या कलाकारांकडून डिझाईनचा ‘थ्रीडी’द्वारे सराव करण्यात येत असून, अधिक बारकावे दिसण्यासाठी कलाकुसरीने काम हाती घेतले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मैत्रीचा गैरफायदा घेत, तरुणीचे अपहरण करून बलात्कार; तरुणाला अटक