Pune News : पुणे : एकाच कॉलेजमध्ये शिकत असल्याने, त्या दोघांची मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तरुणाने जबरदस्तीने तिचे अपहरण करुन तिला पनवेल, बाणेर येथे घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा प्रकार पनवेल व बाणेर येथे ५ ते ७ सप्टेंबर या दरम्यान घडला.
लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका १९ वर्षांच्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तबरेज शेख (वय १९, रा. शिवाजी मार्केटजवळ, कॅम्प) याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये शिकत असून, त्यांच्यात मैत्री आहे. आरोपीने फिर्यादीला काहीही न सांगता, माझ्या दुचाकीवर बस म्हणून तिला दुचाकीवरून पुणे स्टेशन येथे घेऊन गेला. तेथून ट्रेनने पुढे पनवले येथे नेले. तेथून पुढे एका लॉजवर नेवून जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. (Pune News ) त्यानंतर तिला बाणेर येथील लॉजवर आणून तेथेही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान, या प्रकरणाची फिर्याद संबंधित तरुणीने दिल्यानंतर पोलिसांनी तबरेज शेख याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसुडे करीत आहेत.