Pune News : पुणे : पुणे-बिकानेर एक्सप्रेसने पुण्याशी सुरत, बडोदा, अहमदाबाद आणि जोधपूर ही शहरे थेट जोडली गेली आहेत. ही साप्ताहिक गाडी सुरू झाली असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी उद्घाटनाचा हिरवा झेंडा दाखवला. (Surat, Baroda, Ahmedabad and Jodhpur cities will be directly connected to Pune by Pune-Bikaner Express; Green flag of Union Railway Minister)
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
पुणे रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमास राजस्थानमधील पालीचे खासदार पी.पी.चौधरी आणि सुमेरपूरचे आमदार जोराराम कुमावत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (Pune News)
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी स्वागत केले तर विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी आभार मानले.
मध्य रेल्वेने पुणे-बिकानेर ही नवीन विशेष गाडी सुरू केली आहे. पुण्यातून पहिली गाडी मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी रवाना झाली. ती बिकानेरला बुधवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. पुणे-बिकानेर ही विशेष गाडी साप्ताहिक असेल.(Pune News) ही गाडी दर मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातून रवाना होईल. ती बिकानेरला दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.
ही गाडी बिकानेरमधून दर सोमवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. अशी माहिती रेल्वे विभागाने दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात आगीचे सत्र सुरूच, वाघोलीतील गोडाऊनला भीषण आग
Pune News : धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून