राहुलकुमार अवचट
Pune News : पुणे : मोफत उपचार आमच्या हक्काचे., नाही कोणाच्या बापाचे, रुग्णांना न्याय मिळालाच पाहिजे, रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत रुग्ण हक्क परिषदेच्या समस्त कार्यकर्त्यांनी पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील डेक्कन परिसरातील गुडलक चौकामध्ये तीव्र निदर्शने करीत लक्षवेधी धरणे आंदोलन केले.
गुडलक चौकामध्ये निदर्शने
पुण्यातील गुडलक चौकात हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. (Pune News) यावेळी परिषदेचे केंद्रीय सल्लागार अनिल गायकवाड, पुणे शहर अध्यक्ष अपर्णा साठे-मारणे, दत्ता पाकीरे, अमोल पडळकर, संजय कुरकुटे, यशवंत भोसले, अनिकेत कांबळे, प्रभाताई अवलेलू, रोहिदास किरवे, भानुदास मानकर, कविताताई डाडर, दीपक खेडकर, महादेव बनसोडे, कुमार साबळे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले, अन्नसुरक्षा कायद्याच्या धर्तीवर औषधांच्या महागड्या किमतींना चाप लावण्यासाठी औषध सुरक्षा कायदा सुद्धा झाला पाहिजे. (Pune News) तसेच कायद्यानेच सर्व रुग्णांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत. यासाठी पुणे शहरासह राज्यभर ठीक ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत.
दरम्यान, यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. अशाही घोषणा देण्यात आल्या. (Pune News) धर्मदाय रुग्णालयांमध्ये रुग्णांची अडवणूक केली जाते. बिल भरायला पैसे नसतील तर जिवंत रुग्ण तसेच मृतदेहालाही अडवून ठेवले जाते, डांबून ठेवले जाते असा आरोप देखील रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पंतप्रधान पीक विमा योजनेत महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर…..
Pune News : धावता धावता चक्कर आल्याने आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू
Pune News : बेकायदा सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या ; किरकिटवाडी परिसरातील घटना..