Pune News : पुणे : सोशल मिडीयावर ओळख वाढवून महिलेच्य़ा विश्वासाचा गैरफायदा घेत तब्बल पावणे दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 14 एप्रिल रोजी चिंचवड येथे घडला आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकऱणी महिलेने मंगळवारी (दि.20) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) त्यानुसार अज्ञात मोबाईल धारक व दोन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी व्हॉटस अप व टेलिग्रामवरून ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच ऑनलाईन चॅटींग करत वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने 1 लाख 73 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Pune News) केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कंपनीच्या व्यवहारात 10 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरमी कर्मचाऱ्यावर गुन्हा
Pune News : एसटी विरोधात युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन; सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी