Pune News : पुणे : पुणे : केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) सोन्याची भुकटी असलेली कॅप्सुल गुप्तांगामध्ये लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील लोहगाव विमानतळावरून दोन अधिकाऱ्यांना पकडले असून, त्यांच्याकडून ३३ लाख ३३ हजार रुपयांची ५५५ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त केली आहे.
३३ लाख ३३ हजार रुपयांची सोन्याची भुकटी जप्त
अधिक माहितीनुसार, लोहगाव विमानतळावर दुबई येथून आलेल्या दोन तरुणांची हालचाल संशयास्पद वाटत होती. ते विमानतळाच्या बाहेर पडण्यासाठी घाई करत होते. (Pune News) विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणी केली असता, त्यांनी गुप्तांगात सोन्याची भुकटी असलेल्या कॅप्सुल लपवल्याचे आढळून आले.
दरम्यान, लपवलेल्या कॅप्सुलमध्ये तब्बल ५५५ ग्रॅम सोन्याची भुकटी तस्करी करुन पुण्यात आणल्याचे निदर्शनास आले. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ही सोन्याची भुकटी जप्त केली आहे. (Pune News) या सोन्याची किंमत ३३ लाख ३३ हजार रुपये असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील तीन गुंडांच्या तडीपारीचे आदेश; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा दक्ष
Pune News : रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवले जीवन