Pune News : पुणे: शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना दुसरीकडे मात्र एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चालू वर्षाची शैक्षणिक फी न भरल्यामुळे राजगुरुनगर मधील एका नामांकित शाळेने पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर हाकल्याचे समोर आले आहे. यामुळे पालकांना नाराजी व्यक्त केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मनसेचे सोपान डुंबरे, नितीन ताठे यांनी आक्रमक पवित्रा घेत शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. (Pune News) त्यानंतर जवळपास एक तासाने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.
नागरिक, विविध संघटना आक्रमक
खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.टी ई एस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुरूवारी (दि १५) घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे पालक वर्गाबरोबरच शहरातील नागरिक, विवीध संघटना आक्रमक झाल्या आहेत. शाळेच्या या कारवाईचा निषेध करत शिक्षण विभागाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. (Pune News) इयत्ता आठवी ते दहावी च्या वर्गातील हे विदयार्थी आहेत. चालू वर्षाची शैक्षणिक फी या विद्यार्थ्यानी भरली नव्हती.
पहिला दिवस म्हणून उत्साह आणि आनंदाने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात आल्याने विदयार्थी, पालक मनस्वी दुखावले. शाळेचा पहिला दिवस म्हणुन सर्व शाळा विद्यार्थ्यांचे वाजत गाजत आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतात. मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांचचे असे स्वागत झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Pune News) वर्गाबाहेर काढलेल्या विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांना पालक येईपर्यंत शाळेच्या व्हरांड्यात उघडयावर बसावे लागणे ही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणामकारक घटना असल्याच्या प्रतिक्रीया पालकांनी नोंदविल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मान्सून रत्नागिरीतच अडकला
Pune News : मांजरी, वाघोलीसह पुणे महानगरपालिका हद्दीत बेकायदा प्लॉटिंग घेत असाल तर सावधान…
Pune News : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतूकीसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन