Pune News : पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सुपारी घेऊन पत्रकारावर गोळीबार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
१३ जण पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.. प्रथमेश उर्फ शंभू धनंजय तोंडे (वय २०, रा. राजेंद्रनगर, दत्तवाडी), अभिषेक शिवाजी रोकडे (वय २२, रा. नांदेड गाव) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. असून, त्यांच्या ४ अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण १३ जणांना ताब्यात घेतले असून, त्यातील ७ जण अल्पवयीन आहेत. काही मुले उच्च शिक्षित आहेत. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, १ जिवंत काडतूस, ३ कोयते, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाइल असा २ लाख २५ हजार रुपयांचा मालदेखील जप्त केला आहे. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.
फिर्यादी हे एका दैनिकात उपनगर वार्ताहर म्हणून काम करतात. ते २७ मे रोजी रात्री दुचाकीवरून घरी जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी त्यांच्या अंगावर मिरची पावडर टाकून कोयता घेऊन अंगावर धावून गेले होते. (Pune News) त्यावेळी फिर्यादी जीव वाचवून तेथून पळून गेले होते. त्यानंतर ११ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते घराजवळ आले असताना दोन दुचाकीवरून आलेल्या ५ जणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यातील एकाने पिस्तुलातून त्यांच्यावर गोळीबार केला. फिर्यादी हे खाली वाकल्यामुळे यातून वाचले.
या आरोपींनी तोंडाला रुमाल व मास्क घालून तोंड लपवत डोक्यावर टोपी घातली होती. रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्हीत गाडीचा नंबर स्पष्ट दिसून आला नाही. (Pune News) पोलिसांची दोन पथके तयार करून एक पथक रांजणगावला, तर दुसरे धायरी येथे रवाना केले. यात पोलिसांनी पेरणे फाटा येथे पाठलाग करून दोघांना पकडले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
फिर्यादी यांची धायरी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. त्याचा वाद सुरू आहे. (Pune News) दरम्यान, ही सुपारी कोणी दिली होती, किती रकमेची होती, याची माहिती पोलिसांनी दिली नाही. स्वारगेट ठाण्याचे माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर व प्रभारी वरिष्ठ निरीक्षक सुनील झावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी मारहाण प्रकरण अपडेट बातमी ; या कारणामुळे झाली मारहाण..