Pune News : पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने धावत्या रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केली आहे. सावत्र आई आणि वडीलांकडून दिल्या जाणाऱ्या सतत मानसिक, शारीरिक त्रासातून मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. ही मुलगी येरवडा भागात रहावयास होती.
वडील आणि सावत्र आईचा सतत त्रास
अश्विनी चव्हाण ( वय 17 )असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीचे मामा शंकर राठोड यांनी येरवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pune News) त्यावरून वडील नामदेव तुकाराम चव्हाण आणि सावत्र आई या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अश्विनी चव्हाण हिच्या आईचे निधन झाल्यानंतर आरोपी वडील नामदेव चव्हाण याने आरोपी दुसरे लग्न केले. त्यानंतर वडील आणि सावत्र आई हे दोघे मयत अश्विनी हिला घरातून बाहेर पडू देत नव्हते. (Pune News) तिला शिक्षण करू देत नव्हते आणि तिला मारहाण देखील करीत होते. या सर्व त्रासाला अश्विनी कंटाळली होती. त्याच दरम्यान सर्व कुटुंबीय गुलबर्गा येथे लग्नासाठी गेले होते. तेथून पुण्याकडे रेल्वेमधून सर्वजण येत प्रवास करीत होते. दौंडपर्यंत रेल्वे आल्यावर अश्विनी हिने चालत्या रेल्वेमधून उडी मारली. यामध्ये अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दुधात भेसळ करणा-यांना मोक्का लावणार! : दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Pune News : धक्कादायक! सुपारी घेऊन पत्रकारावर गोळीबार ; जमिनीच्या व्यवहारातून घडला प्रकार