Pune News : पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील कर्मचाऱ्याला (बेलिफ) एक हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी पकडले. लक्ष्मण नथू काळे (वय ४०) असे या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी काळे याच्यासह आाणखी एकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
समन्स बजावण्यासाठी मागितली होती लाच
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार महिलेने जमिनीच्या वादासंदर्भात शिवाजीनगर न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात प्रतिवादी व्यक्तीला न्यायालयाने हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्याची जबाबदारी काळे याच्यावर सोपविण्यात आली होती. (Pune News) समन्स वेळेत बजावून याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी काळे याने महिलेकडे एक हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात सापळा लावून काळे याला महिलेकडून एक हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पतीचा पगार घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या महिलेचा बॉसकडून विनयभंग; गुन्हा दाखल