Pune News : पुणे : गुजरातमध्ये नर्मदातीरी उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याच्या धर्तीवर शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी केली.
देशाला अभिमान वाटेल, अशा आणखी तीन घोषणा २९ सप्टेंबर रोजी होणार
देशाला अभिमान वाटेल, अशा आणखी तीन घोषणा २९ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी जुन्नर तालुक्यामध्ये २५ एकर जागेची निवड करण्यात आली असून, त्याची खरेदी देखील झाली आहे. शिवरायांचा हा पुतळा ब्रॉन्झ धातूमध्ये तयार करण्यात येणार आहे. शिवरायांच्या हातात तलवार असलेला हा पुतळा मुंबई येथे तयार करण्यात येणार आहे. (Pune News) जे. जे स्कूल ऑफ आर्टस् या नामांकित संस्थेत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकाराची पुतळा बनविण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सोनवणे म्हणाले की, ही संकल्पना माझी असल्याने, याचा आर्थिक भार इतरांवर न टाकण्याचा निर्णय घेतला होता; परंतु मित्र आणि सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे “श्रीमंत योगी स्मारक ट्रस्ट”ची स्थापना करण्यात आली आहे. (Pune News) पुतळ्याच्या आसपासच्या जागेमध्ये शिवकालीन इतिहास जागवणारे काम ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. संपूर्ण उभारणी आणि देखभाल ट्रस्टच्या माध्यमातून केली जाणार आहे.
दरम्यान, शरद सोनवणे यांचे समर्थक जुन्नर परिसरामध्ये मोठ्या फ्लेक्सच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘२९ सप्टेंबर रोजी सर्वांत मोठी घोषणा होणार,’ असे व्हायरल करत आहेत. (Pune News) या तीन मोठ्या घोषणा कोणत्या, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : राज्यात जोरदार पाऊस पडू दे… अजित पवार यांची कसबा गणपतीसमोर प्रार्थना
Pune News : मद्य पाजून तरुणीवर क्लिनीकमध्ये बलात्कार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
Pune News : शिरूर हवेलीसह जिल्ह्यातील १० मंडल अध्यक्षांची नियुक्ती जाहीर