Pune News : पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर नराधमाला पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मनोरुग्णालयात असतानाच नराधमाने एका १६ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकारानंतर याच मुलाला मनोरुग्णालयातील सिस्टर व ४ गार्डनी वेळोवेळी भुलीचे इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
माथेफ़िरू तरुणासह सिस्टर आणि गार्डवर गुन्हा दाखल!
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अनिकेत गोखले (वय २५, रा. मनोरुग्णालय, येरवडा) आणि अनोळखी सिस्टर व ४ गार्डवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० मे २०२३ ते २६ जून २०२३ यादरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील एका १६ वर्षांच्या मुलाला खेड पोलिसांनी येरवडा बालनिरीक्षणगृहात ठेवले होते. तेथून त्या मुलाला मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. (Pune News) दरम्यान, याच प्रादेशिक मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अनिकेत गोखले याच्यावरही उपचार सुरु होते. आरोपी अनिकेत गोखले याने या १६ वर्षांच्या मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला. उपचारानंतर या मुलाला मनोरुग्णालयातून सोडण्यात आले.
दरम्यान, संबंधित १६ वर्षांच्या अत्याचारग्रस्त मुलाला रूग्णालयातून सोडल्यानंतर त्याला पुन्हा नव्याने कोल्हापूर येथे शाळेत दाखल करण्यात आले. शाळेत गेल्यानंतर आपला डावा हात दुखत असल्याची तक्रार तो सतत करु लागला. (Pune News) त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्या हाताचा एक्स-रे काढण्यात आला. त्यावेळी मुलाच्या हाताला तब्बल १८ ठिकाणी सुईसारख्या टोकदार वस्तूने टोचल्याने निदर्शनास आले. त्यानंतर मुलाने प्रादेशिक मनोरुग्णालयात ३० मे २०२३ ते २६ जून २०२३ यादरम्यान घडलेल्या घटनेचा खुलासा केला.
प्रादेशिक मनोरुग्णालयातील सिस्टर व ४ गार्ड यांनी त्याला भुलीचे इंजेक्शन दिल्याने त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) पुढील तपास येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गाताडे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सिंहगड घाट रस्त्यावर ४ ते ५ ठिकाणी दरडी कोसळल्या ; नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Pune News : पिंपरी-चिंचवड, नगर, सोलापूरसह राज्यात ८ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालये होणार