Pune News : पुणे : तृतीयपंथीयांना एरवी समाजात मानाचे स्थान दिले जात नाही. त्यांना कायमच अवहेलना, मानहानीला सामोरे जावे लागते. तृतीयपंथीयांना उत्तम आरोग्यसुविधा देण्याबाबतही अनुकूलता दाखवली जात नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाने एक पाऊल पुढे टाकले आहे. रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला आहे.
सहजपणे उपचार मिळणार!
ससून रुग्णालयातील नवीन ११ मजली इमारतीचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या वॉर्डमध्ये २४ बेड असून, दोन अतिरिक्त आयसीयू बेड आहेत. दरम्यान, तृतीयपंथीयांवर उपचार करण्यास अनेक रुग्णालये नकार देतात. (Pune News) मात्र, त्यांना ससूनमध्ये अतिशय सहजपणे उपचार मिळणार आहेत. या वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना संवेदनशीलपणे वागण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
तृतीयपंथीयांना उपचार घेण्यास अनेक अडचणी येतात. त्याचबरोबर त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. आर्थिक कारणांमुळे बहुतांश तृतीयपंथीय उपचारांसाठी ससून रुग्णालयात जातात. (Pune News) तिथे आता त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात आल्याने त्यांना चांगली वागणूक मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ससून रूग्णालयाच्या या निर्णयामुळे तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपचाराची नवी दिशा मिळणार आहे. पुढील काळात इतरही रुग्णालयांकडून ससूनचे अनुकरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबई येथील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात पहिल्यांदा तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग होता. (Pune News) त्यानंतर राज्य सरकारने इतरही रुग्णालयांना या प्रयोगाचे अनुकरण करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ससून रुग्णालयाने पावले उचलल्यामुळे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात यश आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मंगलमुर्तींच्या किमती यंदा २५ ते ३० टक्क्यांनी वाढणार…!
Pune News : पुणेकरांसाठी गुड न्यूज! लोहगाव विमानतळावरून आता २४ तास वाहतूक…!