Pune News : पुणे : स्वतःच्या मालकीची नसलेली मासेमारीची नाव दुसऱ्याला विकून, त्याच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये घेऊन पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात कुलाबा पोलिसांना यश आले आहे. मुंबई पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने सोमवार पेठेत पकडले. प्रफुल्ल जयवंत कोळी (वय ३०, रा. रेवळ, ता. अलिबाग, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कुलाबा पोलिसांची कामगिरी
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळी याच्याविरुद्ध पोलिसांनी सप्टेंबर २०२० मध्ये कुलाबा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.(Pune News) कोळी याने स्वतःच्या मालकीची नसलेली मासेमारीची नाव दुसऱ्याला विकली होती. त्याच्याकडून तीन लाख ८० हजार रुपये घेऊन तो पसार झाला होता. कुलाबा पोलिसांनी अखेर त्याचा शोध घेतला आहे.
दरम्यान, पोलीस शोध घेत होते. गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस कर्मचारी निलेश साबळे सोमवार पेठेत गस्त घालत होते. तेव्हा फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी कोळी सोमवार पेठेतील एका हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळाली.
पोलिसांच्या पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने पकडले. (Pune News) वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, निलेश साबळे, अजय थोरात, दत्ता सोनवणे, राहुल मखरे, अभिनव लडकत, अण्णा माने, महेश बामगुडे आदींनी ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खडकीतून कर्नलचे पिस्तुल आणि २० जिवंत काडतुसांची चोरी
Pune News : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची ससून रुग्णालयाला अचानक भेट…!
Pune News : मुंढव्यात ४६ लाखांचे कोकेन, मेफेड्रोन जप्त; एका महिलेसह तिघांना अटक