Pune News : पुणे : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी!… अशा भावपूर्ण वातावरणात, लाखो पुणेकरांच्या उपस्थितीत मानाच्या पाच गणपतींचे ढोल-ताश्यांच्या गजरात विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो पुणेकरांनी गर्दी केली होती.
सायंकाळी सातच्या आत मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन
पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस सकाळी सव्वा दहा वाजता सुरूवात केली. पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. (Pune News) पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुजा करून मिरवणुकीला सुरूवात झाली.
दरम्यान, मिरवणूकीचा उत्साह वाढत असतानाच सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वरूणराजाने जोरदार हजेरी लावली. (Pune News) पुणेकर भाविकांनी पावसात भिजत मोठ्या भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप दिला. गतवर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी सातच्या आत मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
– मानाचा पहिला कसबा गणपती – १०:१५ वाजता मिरवणूक सुरू, ४:३५ वाजता विसर्जन.
– मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती – ११ वाजता मिरवणूक सुरू, ५ :१० वाजता विसर्जन.
– मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती- १२ वाजता मिरवणूक सुरू, ५: ५५ वाजता विसर्जन.
– मानाचा चौथा तुळशीबाग गणपती- १ वाजता मिरवणूक सुरू, ६:32 वाजता विसर्जन.
– मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती- २:१५ मिरवणूक सुरू, ६:४५ वाजता विसर्जन.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पतीचे टोमणे व मारहाणीला कंटाळून, पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
Pune News : अग्निवीर म्हणून लष्करात भरती करण्याचे आमीष; १६ तरुणांना लाखोंचा गंडा