Pune News | पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रशासनाकड़ून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पटोले हे विद्यापीठात १० मे रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते त्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक अडचणी वसतीगृह, भोजनगृहाचा दर्जा, राष्ट्रीय शैक्षणीक धोरण आदी विषयावर बोलण्यासाठी ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास परवानगी द्यावी आणि कॉमर्स हॉल मिळावा यासाठी दि.३ मे २०२३ रोजी लेखी पत्र कुलसचिवाना देण्यात आले होते. मात्र, त्यास ५ दिवस होऊनही अद्याप परवानगी दिली नाही.
दरम्यान, पटोले यांच्या कार्यक्रमाला परवानगी न मिळाल्याने विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधीनी सोमवारी प्र. कुलगुरू यांची भेट घेतली. तेव्हा येत्या १० मे रोजी विद्यापीठात जी २० च्या आनुषंगाने कार्यक्रम असल्याने परवानगी मिळणार नाही असे तोंडी उत्तर आम्हाला दिले. याबाबत लेखी उत्तर मागितले असता तेही आम्हाला देण्यात आले नाही. असे विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी कुलदीप आंबेकर यांनी सांगितले आहे.
विद्यार्थीच्या चर्चासाठी विद्यापीठ प्रशासन परवानगी देत नसेल तर आम्ही कार्यक्रम घेण्यावरती ठाम आहोत.असे आंबेकर यांनी सांगितले आहे. तसेच आमची कोणी अडवणूक केल्यास अथवा काही अनुचित प्रकार घडला तर त्यास विद्यापिठ प्रशासन जबाबदार असेल असेही ते म्हणाले आहे. यावेळी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे यांच्यासह नितीन आंधळे, नारायण चापके, गजानन अडबलवार, तुकाराम शिंदे, सागर अलकुंटे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : घर का भेदी लंका ढाए! सराफी व्यावसायिकाला कारागिरांनीच घातला तब्बल २२ लाखाला गंडा..