Pune News : पुणे : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात २००५ पासून लागू करण्यात आला असून, शासनाने वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायद्याच्या व्यापक प्रसिध्दीसाठी व प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाययोजना करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य राहुलकुमार अवचट यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे जिल्हा व दौंड तालुका प्रशासनाकडे मागणी
२८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन असून, कायद्यातील तरतुदी, कार्यपध्दती, विविध माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देऊन व विविध उपक्रम राबवून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्याची मागणी राहुलकुमार अवचट यांनी पुणे जिल्हा व दौंड तालुका प्रशासनाकडे केली आहे. (Pune News) याबाबतचे निवेदन पुणे विभागीय विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दौंडचे तहसीलदार, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सहाय्यक निबंधक, तालुका वन अधिकारी, उप अभियंता, बांधकाम विभाग यांच्याकडे देण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविदयालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच
चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित करावी. (Pune News) यासाठी अशासकिय समाजसेवी संस्थांचा सहयोग घेण्यात यावा. हा उपक्रम व्यापक पातळीवर जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकाराबाबत माहिती होण्यासाठी माहिती अधिकार कायदा प्रभावशाली ठरत आहे. सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दरवर्षी २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा.
यावर्षी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद सणांची सुट्टी असल्याने सदर माहिती अधिकार दिन २७ सप्टेंबर किंवा २९ सप्टेंबर या दिवशी साजरा करावा. (Pune News) याबाबतच्या आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयांना याबाबतच्या सूचना कराव्या, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा वर्गातच केला विनयभंग
Pune News : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सहकारनगर परिसरातून अटक