Pune News : पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीतून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने एकाची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वानवडी पोलिसात गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जॉन पॉलराज व्हिन्सेट (रा. वानवडी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून रवि नरोत्तम ओझा (रा. प्रितम सोसायटी, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओझा याने व्हिन्सेट यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला दिला. (Pune News) तसेच यामध्ये जास्त परतावा मिळू शकतो, असे आमिष दाखवून, गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढले. ओझा याच्या बोलण्याला भाळून त्यांनी ओझा याच्यावर विश्वास ठेवला आणि सेवानिवृत्तीनंतर मिळालेले ४० लाख रुपये शेअर बाजारात गुंतवले.
दरम्यान, ओझा याने रक्कम घेतल्यानंतर त्यांना परतावा दिलाच नाही. योग्य परतावा न दिल्याने जॉन यांनी रक्कम परत करण्यास सांगितले. (Pune News) तेव्हा ओझाने टाळाटाळ सुरु केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जॉन यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. ओझाने शेअर बाजारात गुंतवणकीतून अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट
Pune News : चांगल्या परताव्याच्या आमिषाने आयटीतील महिलेसह ८ जणांची फसवणूक; गुन्हा दाखल