Pune News : पुणे : टास्क फ्रॉडच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका सेवानिवृत्त कर्नलला तब्बल अडीच कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. टास्क, लाइक, सबस्क्राइब आणि पार्टटाइम नोकरीचे प्रलोभन दाखवून फसवणुकीचे गुन्हे प्रचंड वाढले आहेत. गेल्या २ महिन्यात अशा प्रकारे किमान ६६ तक्रारी आल्या असून, त्यात तब्बल २० कोटी रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. (Retired colonel in Pune also caught in the net of task fraud)
याप्रकरणी एका ७१ वर्षीय कर्नलने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सेवानिवृत्त कर्नल आहेत. त्यांना व्हॉट्सॲपवर ऑनलाइन रिव्ह्यू लिहिण्यापासून तसेच व्हिडीओला लाइक करून जादा परतावा मिळविण्याचा मेसेज आला होता. सुरुवातीला त्यांच्या खात्यात काही पैसे जमा झाल्याने (Pune News) त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांच्याशी चॅटिंग सुरू केले. त्यांना प्री-पेड टास्क स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. कर्नल यांनी चोरट्यांच्या सांगण्याप्रमाणे १८ खात्यात ४८ व्यवहारांद्वारे ते पैसे भरत गेले. आपली फसवणूक होतेय, हे लक्षात येईपर्यंत त्यांची सर्व बचत आणि सेवानिवृत्तीची जमा असलेली रक्कम गेली होती.
याविषयी सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल पाटील यांनी सांगितले की, एप्रिल आणि मे महिन्यात हा सर्व प्रकार झाला असून, त्यांनी घरच्यांना याबाबत काहीही सांगितले नाही. (Pune News) त्यांची तक्रार येताच बँकांना संबंधित खात्यातील पैसे गोठविण्यास सांगण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अशी होते फसवणूक
– बँक खात्यावर पैसे आल्यानंतर एखादी लिंक किंवा प्ले स्टोअरवरून एखादे ॲप डाउनलोड करण्यास सांगतात
– यावरून नोंदणी केल्यानंतर वॉलेट अकाउंट तयार होते
– टास्क जिंकून कमावलेली रक्कम या वॉलेटमध्ये जमा होते
– नियमित रक्कम येत असल्याने गुंतवणुकीस सांगितले जाते
– गुंतवलेल्या रकमेवर नफा देखील वॉलेटमध्ये दिसतो
– क्रिप्टो करन्सी किंवा इतर आभासी चलनात गुंतवणूक करण्यास सांगितली जाते
– नफा दिसत असल्याने संबंधित व्यक्ती आणखी गुंतवणूक करते
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ओतूर पोलिसांची कामगिरी..! साडेचार लाखांचे गहाळ झालेले १९ मोबाईल मिळाले नागरिकांना परत..