Pune News : पुणे : पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशांना आता पीएमपीकडून शंभर रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि चालक-वाहकांच्या सेवेत सुधारणा व्हावी, यासाठी पीएमपीएलचे नवीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह हा नवीन उपक्रम राबवणार आहेत.
नव्या अध्यक्षांनी कार्यभार हाती घेतल्यापासून अनेक नवे उपक्रम सुरु केले आहेत. सामान्य प्रवाशांप्रमाणे पीएमपीएलमधून प्रवास करून प्रवाशांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, असा अभिनव उपक्रम ते राबवत आहेत. आता प्रवाशांच्या सुखकर आणि विनाअपघात प्रवासासाठी त्यांनी प्रवासी नागरिकांनाच साद घातली आहे.(Pune News) प्रवाशांनी बेशिस्त चालकाविरूद्ध तक्रार नोंदवल्यास आणि त्यात तथ्य असल्यास १०० रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती पीएमपीएमएलच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली आहे.
अशी करा तक्रार…
– कोणताही चालक किंवा वाहक बस चालवताना मोबाईल फोन वापरताना, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवताना किंवा रुट बोर्ड नसलेली बस चालवताना आढळल्यास पीएमपीएमएल कडे ई- मेल: [email protected] किंवा व्हाट्सअॅप : ९८८१४९५५८९ द्वारे त्वरित तक्रार करू शकता.
– तक्रार करताना फोटो, व्हिडिओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख आणि वेळ या सर्व तपशीलांसह तक्रार नोंदवणे गरजेचे आहे.
– तक्रार योग्य असल्यास नागरिकांना १०० रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात येतील.
– नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर १००० रूपयांचा दंड लादण्यात येईल.
… असे असेल बक्षिसाचे नियोजन
चालकाने केलेल्या बेशिस्तपणाबद्दल त्यांच्या पगारातून दंडाची रक्कम वजा करण्यात येणार आहे. यामधील रक्कम तक्रारदार प्रवाशाला बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे, (Pune News) असे पीएमपीएलचे नवीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रवासी दिनाचे आयोजन…
प्रवाशी सेवा लोकाभिमुख होण्यासाठी प्रत्येक आगारामध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत “प्रवासी दिन” आयोजित करण्यात येणार आहे. (Pune News) प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन कामामुळे किंवा वेळेअभावी आगारात येऊन तक्रार किंवा सूचना करता येत नसेल त्या प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या मुख्य बस स्थानकांवर व पास केंद्रांवर अर्ज करावेत. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हिमाचलमध्ये पावसाच्या तडाख्यात सापडलेले १७ पुणेकर सुरक्षित
Pune News : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; खडकवासला येथील घटना