Pune News : पुणे : पुणे – पिंपरी चिंचवड मधून लाखो नागरीक १९ सप्टेंबर पासून सुरु होणा-या गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. या नागरिकांना कोकणाकडे जाण्यासाठी ताम्हिणी घाटातील एकमेव रस्ता सोयीस्कर आहे. परंतू, मागील महिण्यातील पावसामुळे या रस्त्याची दूरावस्था झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापुर्वी ताम्हिणी घाटातील रस्त्यांची कामे युध्द पातळीवर पुर्ण करावीत. अशी मागणी कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी केली आहे. रुपेश मोरे यांनी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
या पत्रात म्हटले आहे की, पुणे, पिंपरी चिंचवड मधिल कोकणवासीयांचे आपल्या मुळगावी कोकणात जुलै महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. (Pune News) शेत जमिनी वाहून गेल्या असून घरांची पडझड झाली आहे. त्याची डागडूजी करणे देखिल आवश्यक आहे. त्यामुळे सप्टेंबर महिण्याच्या दुस-या आठवड्यात अनेक नागरीक आपल्या मुळगावी कोकणात जातील.
पुणे – पिंपरी चिंचवड मधिल नागरीकांना कोकणात जाण्यासाठी ताम्हिणी घाटातील रस्ता सोयीस्कर आहे. या रस्त्यावर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. (Pune News) तर ज्या भागात रस्ता सिमेंटचा आहे. तेथे साईड पट्टीवरील भराव, खडी वाहून गेलेली आहेत.
दरम्यान, या मार्गावरून सप्टेंबर महिण्या त वाढणा-या वाहतुकीमुळे अपघात होण्याची व वाहतूक विस्कळीत होण्याची भिती आहे. यासाठी युध्द पातळीवर रस्ते दुरुस्त करावेत. अशी मागणी कोकण खेड युवा शक्तीच्यावतीने रुपेश मोरे यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune news : शिरूर, पुरंदरमध्ये पाणीटंचाई! नागरिकांना आता टँकरवरच भागवावी लागतेय तहान!
Pune News : पुण्यात रुग्ण हक्क संरक्षण कायद्यासाठी ”रास्ता रोको” आंदोलन!
Pune News : पंतप्रधान पीक विमा योजनेत महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर…..