Pune News : पुणे : तुमच्या सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद करण्यासाठी किंवा मृत व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. भूमी अभिलेख विभागाने आता ‘ई-हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून फेरफार अर्जाची माहिती भरल्यानंतर हा अर्ज तलाठ्याच्या लॉगिनमध्ये दिसणार आहे. तुम्ही दाखल केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्यास संबंधित तलाठ्याकडून या पोर्टलवर अर्जदाराच्या लॉगिनमध्ये कळविण्यात येतील आणि त्या त्रुटींची पूर्तताही तुम्हाला लगेचच करता येईल.
‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे तुम्हाला बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे, ई-करार नोंदणी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे यांसह अनेक महत्त्वाची कामे घरबसल्या करणे शक्य होणार आहे. (Pune News) या माध्यमातून आता दोन कोटींहून अधिक ऑनलाइन फेरफार नोंदविले आहेत. तर फेरफारांपैकी केवळ साडेसव्वीस लाख नोंदी या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे झाल्या आहेत.
याविषयी माहिती देताना महसूल विभाग माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या राज्य संचालक सरिता नरके म्हणाल्या की, एखाद्या अर्जदाराने फेरफारसाठी अर्ज दाखल केला आणि तो स्वीकृत झाला तर त्याचा एसएमएस अर्जदाराला येणार आहे. फेरफारचा क्रमांक त्यामध्ये नमूद केलेला असेल. (Pune News) अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर त्रुटी पूर्ततेसाठी अर्ज परत केल्याची माहिती एसएमएसद्वारे अर्जदाराला मिळेल. त्यामुळे हे संकेतस्थळ नुसतेच अर्ज दाखल करण्याचे माध्यम नसून, यामध्ये अर्जाची प्रगती एसएमएसद्वारे मिळणार आहे. राज्य सरकारने अर्जदारांना अर्ज दाखल करण्यासाठी ई-हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सातबाऱ्यावरती दुरुस्त्या करायचे आहेत, त्यांनी वापरावी.
‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे अर्ज करण्याची प्रक्रीया
– अर्जदार संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतो आणि तलाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया करू शकतात.
– संकेतस्थळाला भेट देऊन तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून फेरफार अर्जाची माहिती भरल्यानंतर हा अर्ज तलाठ्याच्या लॉगिनमध्ये दिसणार आहे.
– संबंधित अर्ज मंजूर करून तलाठी फेरफार नोंद करणार.
– याबाबतची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे मिळणार आहे.
कोणते फेरफार ऑनलाईन करू शकता?
– वारसाची नोंद करणे
– मृत व्यक्तीचे नाव कमी करणे
– कर्जाचा बोजा चढविणे
– कर्जाचा बोजा कमी करणे
– ई-करार नोंदणी करणे
– विश्वस्तांचे नाव बदलणे
– अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे
– एकत्र कुटुंब कर्त्याची नोंद कमी करणे
– सातबारा उताऱ्यावरील चुका दुरुस्त करणे
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : राष्ट्रवादीत पॉवर कोणाची? आज होणार फैसला…!
Pune News : शरद पवारांची मोठी घोषणा… आम्ही महाविकास आघाडीसोबतच! म्हणाले, पुन्हा एकदा…
Pune News : शरद पवारांची मोठी घोषणा… आम्ही महाविकास आघाडीसोबतच! म्हणाले, पुन्हा एकदा…