Pune News : पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अनेक उपाययोजना राबवत आहेत. असे असतानाच पुण्यातून पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी उघड झाली आहे. नात्यातीलच असलेल्या एका माथेपीरू तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची गंभीर बाब घडली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी सुनावली. दंडाची रक्कम पीडीत मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या प्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्षा झालेला आरोपी पीडित मुलीच्या नात्यातील आहे. (Pune News) कामानिमित्त तो तिच्या घरी मुक्कामी येत असे. त्याने मुलीवर अत्याचार केले. मात्र, मुलीची आई आजारी तसेच अपंग असल्याने तिने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली नव्हती.
दरम्यान, खटल्याची सुनावणी सुरू असताना मुलीने फितूर होण्याचा प्रयत्न केला होता. सरतपासणीमध्ये तिने तिच्यावर झालेला अत्याचार न्यायालयास सांगितला. मात्र, उलट तपासणीमध्ये तिने तिचे वय जास्त आहे, आरोपीचे नाव चुकीचे आहे, असे न्यायालयात सांगितले. मुलीने ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले होते. (Pune News) आरोपीला टोपण नाव असू शकते. तसेच मुलीचे वय १६ पेक्षा कमी असल्याचे न्यायालयात दाखल असलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे, असा युक्तीवाद सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी केला.
ॲड. वाडेकर यांना सरकारी वकील ॲड. संध्या काळे आणि ॲड. अरुंधती ब्रम्हे यांनी सहाय्य केले. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. पी. कुलथे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. (Pune News) दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असे निकालात नमूद करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : उसने पैशाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी ; निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune News : आयकर सल्लागाराच्या घरावर चोरट्यांनी मारला डल्ला; बंद फ्लॅटमधून लाखोंचा ऐवज लंपास!