Pune News : पुणे : अल्पवयीन, शाळकरी मुलींशी गोड बोलून, त्यांना जाळ्यात ओढून बलात्कार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. येरवडा परिसरात अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन, गोड बोलून तिला जाळ्यात ओढले. विवाहाचे आमिष दाखवून मित्राच्या खोलीवर नेले. त्यानंतर तिच्या इच्छेविरूद्ध बळजबरी करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
येरवडा पोलिसात गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश अण्णा धनगर (रा. ताडीवाला रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) आरोपी धनगरने शाळकरी मुलीशी मैत्री करुन तिला जाळ्यात ओढले. विवाहाचे आमिष दाखवून त्याने तिला मित्राच्या खोलीवर नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, मुलाच्या गोड बोलण्याला भुलून मुलीने मैत्री केली. मात्र, त्यानंतर घडलेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास धनगर याने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. (Pune News) या त्रासाला कंटाळून मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
संबंधित गुन्हा येरवडा परिसरात घडल्याने पोलिसांनी येरवडा पोलिसांकडे तपासासाठी सोपविला असून, पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सेवानिवृत्तीनंतर मिळालेली जमापुंजी शेअर बाजारात गुंतवली; तब्बल ४० लाखांची फसवणूक