राजेंद्रकुमार शेळके
Pune News : पुणे : पुणे स्टेशन येथील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर प्रतिष्ठानचे मुख्य समन्वय विठ्ठल गायकवाड यांना नुकताच रमाईपुत्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
मानवतावादाच्या चळवळी कार्यकर्त्याच्या निष्ठेवरच चालतात. (Pune News) राजकीय क्षेत्रात कार्यकर्त्यांचा वापर होताना दिसतो, पण विठ्ठल गायकवाड एक सेवाभावी कार्यकर्ता म्हणून करत असलेले कार्य खरोखरच प्रशंसनीय व अनुकरणीय आहे. खऱ्या अर्थाने ते कृतिशील विचारवंत व मनापासून समाजसेवा करणारे एक थोर समाजसेवक आहेत, असे गौरवोद्गार डॉ. सबनीस यांनी काढले.
आडकर फाउंडेशन आणि महाराष्ट्र कला प्रसारणी सभा यांच्यातर्फे महामाता रमाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड यांचा 61 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार आणि रमाईपुत्र पुरस्काराने डॉ. सबनीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, महाराष्ट्र कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर, माजी नगरसेविका लता राजगुरू, (Pune News) साखळी पीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीपक पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना विठ्ठल गायकवाड म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमामाई यांच्या प्रेरणेने मी मानवतावादी विचार घराघरात पोहोचवण्याचे कार्य करत आहे. (Pune News) समाजकार्य करताना मला प्रत्येकामध्ये बाबासाहेब आणि माझ्या रमाई माता दिसतात.
दरम्यान, विठ्ठल गायकवाड यांना रमाईपुत्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महामाता रमामाई आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे आरटीओकडून चारचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका