Pune News : पुणे: पुणे शहरात उकाड्याने पुणेकर नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. परंतु, आज दुपारनंतर अचानक आकाशात ढगाळ वातावरण तयार झाल्याने उकाड्यापासून सुटका झाली. तर शहरावरील आकाशात सिबिल क्लाऊड तयार झाल्याने काही भागात पावसाला सुरुवात झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. (Rain started in some parts of Pune; Relief from the heat)
पुढील दोन दिवस सायंकाळी पावसाची शक्यता
येत्या दोन-चार दिवस दुपारी आकाश निरभ्र राहणार असून, सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.(Pune News) शिवाजीनगर परिसरात आकाशात ढग असल्याने पावसाचा अंदाज आहे.
मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.(Pune News) दरम्यान, उद्या दुपारी आकाश निरभ्र असेल आणि सायंकाळी मात्र पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाच दिवस पुन्हा उकाडा जाणवेल, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमधील आयटी कंपनीत भीषण आग; आगीत कर्मचारी अडकले
Pune | अल्पवयीन मुलाला पळवून नेत पदवीधर विद्यार्थिनीने आळंदीत केला विवाह…