Pune News : पुणे : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यासह लोणावळा, दौंड, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इतर स्थानकांचा आता लवकरच कायापालट होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. याशिवाय वंदे भारतसारखी सेमी हायस्पीड ट्रेन सुरु झाली आहे. बुलेट ट्रेन सुरु करण्याचे काम सुरु आहे. लोकलमध्ये बदल केला जात आहे. जुन्या लोकलची जागा वंदे लोकल घेणार आहेत. त्यामुळे ही स्थानके बदलणार आहेत.
अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार
भारतीय रेल्वेत मोठ्या सुधारणा होत आहे. नवीन रेल्वे सुरु केल्या जात आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांचाही विकास केला जात आहे. रेल्वे स्थानकांवर विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत. राज्यातील पुणे, मुंबईसह विविध रेल्वे स्थानकांवर नवीन योजना सुरु होणार आहे. या योजनेंतर्गत देशभरात १ हजार ३०९ स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यात पुण्यासह अनेक स्थानकांचा समावेश आहे. (Pune News) यामध्ये अकोला, भुसावळ, चंद्रपूर, कोल्हापूर, दादर, गुलबर्गा, जळगाव, कल्याण, कुर्ला, मलकापूर, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर, नाशिक रोड, सोलापूर, ठाणे, वर्धा, लोणावळा, मनमाड, अमरावती, मिरज, अहमदनगर, माथेरान, चाळीसगाव, देवळाली, शेगाव, कराड, सांगली, दादर, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, धरणगाव या स्थानकांचा समावेश आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. या योजनेत पुण्यासह लोणावळा, दौंड, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इतर स्थानकांचा समावेश केला गेला आहे. (Pune News) दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्थानकांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानकांचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून सुविधांचे नियोजन केले जाणार आहे.
खबरदारी म्हणून प्रत्येक स्थानकाचा विकास करताना तेथील रोजची सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. याचबरोबर स्थानकाची सध्याची रचनाही विचारात घेतली जाणार आहे. प्रामुख्याने प्रवासी केंद्रित सुविधा स्थानकांवर विकसित केल्या जातील. स्थानकाच्या बाह्य रूपासोबत अंतर्गत भागातही सुधारणा केल्या जाणार आहेत. रेल्वे स्थानकांचे प्रवेशद्वार अधिक चांगले केले जाणार आहे. (Pune News) रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षागृहे अधिक चांगली केली जाणार आहेत. यासाठी नवीन आराखडा तयार होणार आहे. स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. मोफत वाय-फाय किऑस्कची उभारणी देखील केली जाणार आहे.
रेल्वेने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. रेल्वे अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा विकास केला जात आहे. (Pune News) ओडिशाच्या बालासोरजवळ झालेल्या भीषण अपघातासारखे अपघात होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. यामुळे येत्या काही काळात रेल्वे स्थानकांपासून रेल्वेपर्यंत अनेक बदल दिसणार आहेत. यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दुपारी दोन तासांचा ब्लॉक; वाहतुकीत होणार हे बदल!
Pune News : गोळीबार करत तंबाखू व्यापाऱ्याची लूट; ‘आई’ नावामुळे लागला गुन्हेगाराचा छडा!