Pune News : पुणे : ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले.कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन झालेला रेल्वे अपघात हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा अपघात आहे. दरम्यान या अपघातानंतर रेल्वे बोर्ड बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्ड अॅक्शन मोडमध्ये आले आहे. (Railway Board in action mode after Balasore train accident; Trains will run late; But the track must be safe)
रेल्वे बोर्डाकडून प्रत्येक विभागाला कृती आराखडा सादर करण्याची सूचना
रेल्वे बोर्डाकडून प्रत्येक विभागाला कृती आराखडा सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे रेल्वे प्रशासन २६ आठवड्यांचा कृती आराखडा तयार करीत आहे. (Pune News) रुळांच्या सुरक्षेविषयी कोणत्याही परिस्थितीत निष्काळजी न राहण्याच्या सूचना देशातील सर्वच विभागांना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही विभागाला ब्लॉक घेणे आवश्यक असेल तर त्यांना तो आपत्कालीन परिस्थितीनुसार देण्याची सूचना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आली आहे.
गुरुवारी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंग यांनी सिग्नलिंग आणि टेलिकॉम, टीआरडी विभागाच्या अधिकाऱ्यांची व अभियंत्याची बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीत प्रवासी सुरक्षेला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. (Pune News) ऐनवेळी ब्लॉक घ्यावे लागले तरी चालेल, गाड्यांना थोडा उशीर झाला तरीही चालेल, पण प्रवासी सुरक्षितता महत्त्वाची आहे. कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा दिल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत गाड्या मॅन्युअली जाणार नाहीत. इंटरलॉकिंगचे काम पूर्ण होईपर्यंत गाड्या धावणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.
पुण्यासह अन्य विभागांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कार्यालयात बसून न राहता स्थानकात, यार्डामध्ये जाण्याची सूचनाही करण्यात आली आहे. (Pune News) त्यानुसार पुणे विभागातील अधिकारी स्थानकामध्ये परीक्षण करताना दिसून येत आहेत. गुरुवारी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे रेल्वेत प्रवाशांची तिकिटे व सामान तपासात होते, तर सहायक परिचालन व्यवस्थापक सचिन पाटील यार्डात जाऊन मालगाडीला इंजिन व वॅगन जोडण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्नशील होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात सुरक्षा रक्षक भरतीच्या नावाखाली तरुणांची लूट; मंडळाकडून ‘अलर्ट’
Pune News : ‘वर्क फ्रॉम होम’चा मोह नडला; पुण्यातील ‘आयटी’तील दोघांना 50 लाखांचा गंडा
Pune News : जीवनसाथी डॉट कॉम साईटवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीची केली २३ लाखांची फसवणूक