Pune News : पुणे : पुणेकर आपला वेगळेपणा नेहमीच सिद्ध करत असतात. आता पुण्यातून एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. एका पुणेकर काकांनी चक्क हात दाखवून मेट्रो थांबवली आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे.
आजपर्यंत आपण हात दाखवा आणि बस थांबवा हा अनुभव घेतला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी सरकारने ही योजना अंमलात आणली आहे. (Pune News) पण पुणे तिथे काय उणे म्हणतात, त्याप्रमाणे एका पुणेकर काकांनी चक्क हात दाखवा अन् मेट्रो थांबवा, असे करुन दाखवले आहे. यासंदर्भातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
‘पुणे सिटी लाईफ’ या अकाउंटवरुन हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये घाईघाईने एक व्यक्ती येत असल्याचे दिसते. संबंधित व्यक्ती प्लॅटफॉर्मवर पोहचल्यावर मेट्रोजवळ जाते. मेट्रो निघण्याच्या तयारीत असते. (Pune News) मग ती व्यक्ती ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन दार वाजवते. त्याच्यासाठी मेट्रोचे दरवाजे उघडले जातात. ती व्यक्ती मेट्रोत बसल्यानंतर पुन्हा मेट्रो निघण्याच्या तयारी असते. थोडे अंतर जाते, तोपर्यंत आणखी एक व्यक्ती घाईने येते. ती देखील मेट्रोला हात दाखवून दरवाजा उघडण्याची विनंती करते. त्याच्यासाठीही मेट्रो थांबवली जाते. दारे उघडली जातात. त्यानंतर मेट्रो पुढे रवाना होते.
पुणेकर भविष्यात हात दाखवून विमानसुद्धा थांबवून दाखवतील
दरम्यान, पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एकाने म्हटले आहे की,’हात दाखवा, मेट्रो थांबवा’. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की, ‘विनंती थांबा, हात दाखवा मेट्रो थांबवा उपक्रम, इनस्पायर फ्रॉम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ’. एका व्यक्तीने कॉमेंटमध्ये म्हटले आहे की, पुणेकर भविष्यात हात दाखवून विमानसुद्धा थांबवून दाखवतील…आणखी एकाने म्हटले आहे की, पुणेकर बुलेट ट्रेनलासुद्धा हात दाखवून थांबवेल…मग ही तर फक्त मेट्रो आहे.
दरम्यान, या व्हिडिओनंतर काही नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्या गोष्टीत अजिबात लॉजिक नाहीये, त्या गोष्टीतही अभिमान वाटावा असं आहे हे. (Pune News) हा व्हिडिओ नेमका कोणत्या स्थानकावरचा आहे. त्यासंदर्भात माहिती मिळाली नाही. परंतु रात्री उशिरा काढलेला हा व्हिडिओ आहे. ही शेवटची मेट्रो असण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दरवाजा उचकटून १५ लाखांचा ऐवज लांबवला; मार्केट यार्डात व्यावसायिकाच्या बंगल्यात चोरी
Pune News : पुण्यात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध मोक्का; आयुक्तांची मोठी कारवाई