Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करत वेगळी चूल मांडल्यानंतर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून, दोन्ही गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे राज्यातील राजकारणाची सर्वच समीकरणे बिघडली आहेत. पुणे भारतीय जनता पक्षामध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. पुणे जिल्ह्यात पवार कुटुंबाशी नेहमी विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेला मोठा नेता नाराज झाला आहे. अजित पवार नको म्हणून भाजपमध्ये सहभागी झालेला हा नेता आता नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.
हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा
अजित पवार भाजपमध्ये गेल्याने इंदापूरचे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. २०१४ नंतर हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले. अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची पंचाईत झाली आहे. पुणे जिल्ह्यात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले आहेत. (Pune News) जिल्हा बँक आणि जिल्ह्यातील सहकारात हे दोन्ही नेते कायमच एकमेकांच्या विरोधात राहिले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये तडजोड होणे अवघड आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतच दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी अशा जिल्ह्यातील अनेकांना अजित पवार भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री विराजमान झाले, ही गोष्ट खटकली आहे. (Pune News) हर्षवर्धन पाटील, राहुल कुल व प्रदीप कंद यांना अनुक्रमे इंदापूर, दौंड व शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवायची आहे. मात्र, कालच्या अनपेक्षित घटनेमुळे भविष्यात नक्की काय होईल, ही भिती वरील तीनही नेत्यांसह जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सतावत असल्याचे चित्र आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघ आणि अजित पवार यांचा बारामती मतदारसंघ जवळजवळ आहे. हर्षवर्धन पाटील यांनी १९९५ मध्ये काँग्रेसकडे उमेदवारी मगितली होती. (Pune News) त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही. यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी बंडखोरी केली. त्यावेळेपासून पवार घराणे आणि पाटील यांच्यात विळ्या भोपळयाचे सख्य आहे. आता हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार ही जोडी जमणे अवघड आहे. यामुळे आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादीचा संघर्ष पुणे जिल्ह्यात वाढणार हे नक्की आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपच्या मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांनी त्यागाची तयारी ठेवावी, असे आवाहन केले होते. (Pune News) हा त्याग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी करावा लागणार असल्याचे कार्यकत्यांना आता कोठे उमगत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडून २० लाखांचे सोने जप्त ; सीमा शुल्क विभागाची कामगिरी..
Pune News : फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेने वसूल केला तब्बल ९४ कोटींचा दंड