Pune News : पुणे : शहरात पावसाला सुरुवात होताच रस्त्यांची दुरवस्था पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख रस्ते, उपरस्त्यांवर खड्डे पडल्याने रस्ते दुरुस्तीच्या प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. आता याबाबतचे प्रश्न थेट विधिमंडळातही उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी झाडाझडती घेतल्यानंतर पथ विभागाने खड्ड्यांची माहिती कळविण्यासाठी संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक साधनसामुग्रीसह एक वाहन देखील देण्यात आले आहे.
पथ विभागाने खड्ड्यांची माहिती कळविण्यासाठी जाहीर केला संपर्क क्रमांक
महापालिकेच्या पथ विभागाकडून सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाई करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. ही रस्ते खोदाई मे महिन्याअखेरपर्यंत सुरू होती. त्यामुळे रस्ते दुरुस्तीला यंदा पथ विभागाला पुरेसा वेळ मिळाला नाही. जून महिन्यात महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली.(Pune News) रस्ते पूर्ववत करण्याची ही कामे ३१ मे पूर्वीच होणे अपेक्षित होते. यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने जून महिन्यात रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली. ही कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र तीन दिवसांच्या पावसातच खड्ड्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. तशा तक्रारी महापालिकेकडे येण्यास सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला एक रोड मेन्टेनन्स व्हॅन (आरएमव्ही) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये खड्डे बुजविण्यासाठी लागणारे ब्लॉक, खडी, सिमेंट, डांबर, वाळू यांसह कनिष्ठ अभियंता, कर्मचाऱ्यांचे पथक नेमले आहे. (Pune News) महापालिकेकडे येणाऱ्या तक्रारीनुसार तातडीने काम करण्याचे आदेश या पथकाला देण्यात आले आहेत, अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
तक्रारीवर कार्यवाही कशी होणार?
नागरिकांना ९०४९२७१००३ या मोबाइल क्रमाकांवर आपल्या परिसरातील तक्रार नोंदवता येईल; तसेच खड्डे पडलेल्या ठिकाणांची छायाचित्रे व पत्ता व्हॉट्सअॅपद्वारेही पाठवता येईल, असे दांडगे यांनी सांगितले. पथ विभागाचे कर्मचारी तक्रार नोंदवून घेतील. तशी नोंद पालिकेच्या नोंदवहीत करून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता व रस्ता दुरुस्ती पथकालाही कळवतील.(Pune News) यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही केली जाणार असल्याचेही दांडगे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहरात सध्या वाहतूक सिग्नलचे सिंक्रोनायझेशन सुरू आहे. आतापर्यंत सुमारे १२५ सिग्नल बदलण्यात आले आहेत. या सिग्नलसाठी लागणारी वीज आणि इंटरनेटची केबल टाकण्यासाठी चौकांमध्ये वाहने उभी राहतात, त्या ठिकाणीच खोदाई करण्यात आली आहे. (Pune News) पॅचवर्क करून हे खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे पावसात हे ‘पॅच’ पुन्हा खचले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, वाहने खड्ड्यात आदळून अपघातही होत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : एनडीए बॉंबने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून बेड्या
Pune News : पुण्याच्या दुर्गम भागातील ३५५ शाळा दोन दिवस बंद ठेवणार