Pune News : पुणे : लाच घेतल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील 3 पोलीस हवालदारांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. एका कार अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच या पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतली होती. लाच घेताना पोलीस हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर या पोलीस हवालदारांना निलंबीत करण्यात आले आहे. पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी परिमंडळ-4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. यानंत पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस हवालदार राजेंद्र रामकृष्ण दिक्षीत, पोलिस हवालदार जयराम नारायण सावळकर , पोलिस हवालदार विनायक उल्गा मुधोळकर असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस हवालदारांची नावे आहेत.
२० हजार रुपयांची लाच मागितली होती
मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या कारचा अपघात झाला होता. (Pune News) या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी तिघा पोलीस हवालदारांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोड करुन १३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. या प्रकरणात तीन पोलिस हवालदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस हवालदारांवर अशोभनिय वर्तन करून पोलिस दलाची प्रतिमा मलिन करून निष्काळजी व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याचा ठपका ठेवत पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी तिघांना तडकाफडकी निलंबीत केले आहे.
काय आहे प्रकरण
तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी तिघा पोलीस हवालदारांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर सोमवारी त्याची पडताळणी केली. (Pune News) त्यात त्यांनी तडजोड करुन १३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. रात्री उशिरापर्यंत पोलीस नजर ठेवून होते. पोलिसांनी तक्रारदार याची तक्रार मध्यरात्रीनंतर दाखल करुन घेतली. त्यानंतर हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदाराकडून १३ हजार रुपये स्वीकारले. तसा इशारा तक्रारदाराने केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दीक्षित याला ताब्यात घेतले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अनाथ मुलीला धमकावून पाच वर्षे बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना
Pune News : बिनव्याजी कर्जाच्या बहाण्याने तिघांना गंडा घालणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या