Pune News : पुणे : तरुणाई अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करी होत असून, अनेक तस्करांवर पोलीस कारवाई करत आहेत. या प्रकारावर आळा घालण्याचे आवाहन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पोलिसांसह नागरिक उपस्थित होते. (Pune News) पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे हे दोन वर्षे येथेच राहतील, तुम्ही काळजी करू नका, असा चिमटा देखील त्यांनी उपस्थित पोलीस पदाधिकाऱ्यांना काढला.
पोलिसांनी ‘आऊट ऑफ वे’ जाऊन प्रयत्न करण्याची गरज
या वळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात ड्रग्सचे प्रमाण वाढले आहे. यामुळे भविष्यातील सुजाण नागरिक असणारी तरुण पिढी एका वेगळ्या वळणावर जात आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी ‘आऊट ऑफ वे’ जाऊन प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वांना शांत झोप यावी म्हणून पोलीस रात्रंदिवस काम करत असतात. (Pune News) यापुडे देखील पोलिसांना दक्ष रहावे लागेल, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.
पाटील पुढे म्हणाले की, शहरातील बहुतेक शाळा व महाविद्यालयांत विद्यार्थिनींसाठी सुरक्षिततेचे वातावरण नसते. बाहेरून येणाऱ्या टवाळखोर मंडळींचा परिसरात धुमाकूळ सुरू असतो. कट्टे अथवा कॅम्पस्च्या परिसरातील टोळक्यांकडून युवतींची छेडछाड केली जाते. (Pune News) ही बाब लक्षात घेऊन दामिनी पथकाने अशा टवाळखोरांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘महिलांची सुरक्षितता व मदतीसाठी सदैव तत्पर’ अशा दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारप्रकरणी दामिनी पथक हे खूप स्ट्रॉंग करा, असे फटके द्या, की दहशत निर्माण झाली पाहिजे. ताकद इतकी वापरायची की, त्याच्या भीतीनेच प्रश्न संपले पाहिजेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हर घर तिरंगा अभियानांतर्गत शिरूर-हवेलीत तिरंगा बाईक रॅली
Pune News : कोंढव्यात अल्पवयीन मुलाला धमकी देत अत्याचार; तरुणीवर गुन्हा दाखल