Pune News : पुणे : पुणे महानगर परिवहन मंडळाने (पीएमपीएमएल) नॉन स्टॉप बससेवा सुरु केली आहे. ही सेवा पुणे महापालिका ते भोसरीपर्यंत असणार आहे. ही सेवा वाहक विरहीत असून, वातानुकूलित असणार आहे. पुणे महापालिकेपासून सुटल्यावर थेट भोसरी येथेच ही बस थांबणार आहे. वाटेत कोठेही ही बस थांबणार नाही. प्रवाशांना जलद आणि चांगली सेवा मिळावी, तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्तीत जास्त प्रवाशांनी करावा, यासाठी ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहक विरहीत सेवा
याबाबत प्रतिक्रीया व्यक्त करताना व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी आम्ही दोन बस सुरु करत आहोत. प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास आम्ही या मार्गावर अधिक बसेस वाढवणार आहोत. (Pune News) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतल्यास शहरातील प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होणार आहे. या बस सेवेचा फायदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड दरम्यान प्रवास करणाऱ्यांना होणार आहे. विद्यार्थी आणि विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएलने १९२ वातानुकूलित बस घेतल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात या बस मिळणार आहेत. (Pune News) या बसमुळे काही जुन्या आणि कालबाह्य झालेल्या बस बाद केल्या जातील. यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल.
दरम्यान, पीएमपीएमएलने घतलेल्या नवीन बसेसे निगडी, चऱ्होली आणि कोथरूड डेपोतून सुटणार आहेत. पुणे शहरातील सुमारे दोन लाख नागरिक नियमित शहर बससेवेचा वापर करतात.(Pune News) त्यादृष्टीने बसेसची संख्या कमी आहे. अनेक बसचे आयुष्य संपले असले तरी पर्याय नसल्यामुळे त्या सुरु आहेत. परंतु आता एकूण ६५० बस टप्पाटप्याने पीएमपीच्या ताफ्यात येणार आहेत. त्यातील ऑगस्ट महिन्यात १९२ बस येत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळणाऱ्या तिघांना 24 तासांत बेड्या; वारजे पोलिसांची कारवाई