Pune News पुणे : पुणे शहरात फिरताना अनेकदा स्वच्छतागृहाची समस्या सतावत असते. सार्वजनिक स्वच्छतागृह कुठं आहे, असे विचारावं लागत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. (Pune News) पण आता हे करावं लागणार नाही. (Pune News) कारण पुणे महापालिकेने ‘टॉयलेट सेवा ऍप’ सुरु केले आहे. (Pune News) त्यावरूनच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह कुठं आहे, याचे लोकेशनच मिळवता येणार आहे. (Pune News)
शहरातील एक हजार 183 सार्वजनिक स्वच्छतागृहे कुठे आहेत, याची माहिती या ऍपमधून मिळवता येणार आहे. अमोल भिंगे यांनी हे ऍप तयार केले आहे. यामध्ये जवळ असलेले टॉयलेट सर्च करणे, तेथे असलेल्या सुविधा पाहता येणार आहेत. या ऍपमध्ये फिल्टरींगची देखील सुविधा आहे. त्यानुसार वॉश बेसिन, पाणी, लिक्विड सोप किंवा सॅनिटायजर, डस्टबिन, लाईटस, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स अशा सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती स्वतंत्रपणे पाहायला मिळणार आहे.
फीडबॅक आणि तक्रारी नोंदवता येणार
सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य, दुर्गंध हे जणू नित्याचेच झाले आहे. मात्र, या ऍपवर दाखवण्यात आलेल्या टॉयलेटच्या सुविधांबाबत फीडबॅक यासह तक्रारींची नोंदही करता येणार आहे. या ऍपचे उद्घाटन उद्या (दि.22) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते होणार आहे.